गिरीश महाजनांची द्वितीय कन्या अडकली विवाहबंधनात

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १७ मार्च २०२२ | कोरोनाच्या काळात मागच्या दोन वर्षात अनेक नेत्यांनी मुलांची लग्न साध्या पद्धतीने केली. तसेच कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर अनेक नेत्यांनी मुलांची लग्न करणार आहोत. भाजपचे आमदार गिरीश महाजन सध्या आपल्या मुलीच्या लगीनघाईत व्यस्त असून २० मार्च रोजी त्यांच्या द्वितीय कन्येचा जामनेर येथे विवाह सोहळा संपन्न होणार आहे.

महाराष्ट्र राज्य सरकारकडून अनेक कार्यक्रमांवरती बंधनं असल्यामुळे कार्यक्रमाला अनेकांना बोलावणं शक्य होत नाही. सध्या गिरीश महाजन मुलीचं लग्न जळगावमध्ये पार पडणार आहे. याकडे अनेकांचं लक्ष लागून राहिलं आहे.आत्तापर्यंत महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांनी आपल्या मुलांची शाही पद्धतीने केली आहेत.

जामनेर येथील निवासस्थानी विधानसभेचे कामकाज आटोपून भेटलेल्या वेळेत गिरीश महाजन आपल्या मुलीच्या लग्नाची तयारीच्या गडबडीत अडकलेले दिसतात.लग्नाच्या कार्यात महाजन व्यस्त असल्याने शाही पद्धतीने विवाह करील असा अनेकांचा अंदाज आहे.
विवाह मंडपाची तयारी असेल, वरातीसाठी लागणारा घोडा असेल, अशा अनेक कामाच्या लगीनघाईत गिरीश महाजन सध्या व्यस्त आहेत.

जितेंद्र आव्हाडांनी मागच्या महिन्यात आपल्या मुलीचं लग्न अत्यंत साध्या पद्धतीने केले असल्याचे ट्विटच्या माध्यमातून सांगितले. त्यावेळी अनेकांनी त्यांचं कौतुक देखील केलं. त्यांनी साध्या पद्धतीने तर काहींनी धूमधाम मध्ये मुलांचे लग्न केलेले दिसत आहेत.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like