बँकेच्या ३२ ग्राहकांना ६२ लाखांसाठी गंडा घालणाऱ्या गुन्हेगाराला केली अटक
खान्देश लाईव्ह | १७ मार्च २०२२ | जळगावात चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथे बँक ऑफ बडोदा बँकेच्या ३२ ग्राहकांना सुमारे ६२ लाख ६१ हजार रूपयांची फसवणूक करणारा प्रकार समोर आला आहे.त्याच्यावर मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
चाळीसगाव तालुक्यातील देवळी येथील रहिवासी असलेले सुदर्शन साहेबराव पाटील हे मोटार खरेदी-विक्री करण्याचे काम करतात. त्याचे देवळी येथील बँक ऑफ बडोदा शाखेत बँक खाते आहे. बँकेच्या शाखेत बँक मित्र म्हणून निलेश युवराज शिंदे हा काम पाहतो. सुदर्शन पाटील यांनी ३० जून २०२१ रोजी सकाळी बँकेच्या खात्यात १० लाख रूपये भरण्यासाठी आले होते. त्यावेळी निलेश शिंदे याने १० लाख रूपयांचा मी भरणा करतो आणि पावती सायंकाळी देतो असे सांगितले.
निलेशने पैसे भरल्याची पावती दिली नाही. यानंतर आठ दिवसानंतर सुदर्शन पाटील यांना निलेशने बँक खात्यात पैसे भरले नसल्याचे समोर आले आहे. निलेशला विचारल्यास शेतकऱ्यांच्या पिकविम्याचे पैसे भरले असून १ महिन्यात सर्व पैसे परत देतो, असे सांगितले. निलेशने दिलेला चेकदेखील बाऊंन्स झाला. सुदर्शन पाटीलसारख्या ३२ बँकेच्या ग्राहकांची सुमारे एकुण ६२ लाख ६१ हजार ८९१ रूपयांची फसवणूक झाल्याचेही समोर आले आहे. यासंदर्भात सुदर्शन पाटील यांनी मेहूणबारे पोलीसात तक्रार दाखल केली. त्यांच्या
तक्रारीवरून ५ मार्च रोजी संशयित निलेश युवराज शिंदे याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून निलेश शिंदे हा फरार होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर मेहुणबारे पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवत संशयित निलेश शिंदे याला १६ रोजी अटक केली. ही कारवाई मेहुणबारे पोलीस ठाण्याचे सपोनि विष्णू आव्हाड, सपोनि चव्हाण, पो. कॉ. मिलींद शिंदे, गोरख चकोर, शैलेश माळी यांनी कारवाई केली
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम