मासूमवाडी बाजारात २ गावठी कट्टे घेऊन फिरणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १७ मार्च २०२२ | जळगाव शहरातील एमआयडीसी पोलिसांनी गेल्याच आठवड्यात वृद्धांना लुटणाऱ्या आरोपीला गजाआड केल्यानंतर आज दमदार कामगिरी एमआयडीसी पोलिसांनी केली आहे.

मासूमवाडीच्या आठवडे बाजारात २ गावठी कट्टे घेऊन फिरणाऱ्या खलील अली उर्फ डॉलर शाहरुख शकील अली, वय 29 वर्ष, (रा.गेंदालाल मील) असे याचे नाव आहे. गुरुवारी सुधीर साळवे, हेमंत कळसकर यांना मासूमवाडीत एक तरुण गावठी कट्टे विक्रीसाठी आणले असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.पोलीस निरीक्षकांना कळविल्यानंतर कर्मचारी पथक घेऊन कारवाईसाठी रवाना झाले.मासूमवाडी आठवडे बाजारात आल्यानंतर पोलिसांनी काही अंतरावर वाहन उभे करून पायी शोध सुरु केला.

बाजारात संशयास्पदरित्या फिरत असलेल्या एका तरुणाची पोलिसांनी चौकशी करताच तो पळून जाऊ लागला.
पोलिसांनी पाठलाग करीत त्याला पकडले. तरुणाची झाडाझडती घेतली असता त्याच्या कमरेला गावठी बनावटीचे दोन कट्टे मिळून आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी सुधीर सावळे, हेमंत कळसकर, चंद्रकांत बळीराम अशांना गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती. त्यानुसार अतुल वंजारी, हेमंत कळसकर, सुधीर सावळे, इम्रान सैय्द, सचिन पाटील, मुदस्सर काझी, साईनाथ मुंढे यांचे पथकाने ही कारवाई केली आहे.आरोपीला दुपारी न्या.ए.एस.शेख यांच्या न्यायालयात हजर केले असता दि.१९ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकारतर्फे ऍड.सुरळकर यांनी कामकाज पाहिले.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like