पोहण्याच्या नादात चिखलात पाय रुतल्यान पंधरा वर्षीय तरुणाचा मृत्यू
खान्देश लाईव्ह | १७ मार्च २०२२ | चाळीसगाव तालुक्यातील तांबोळे येथे पोहण्याचा मोह एका १५ वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतला आहे. डोहातील चिखलात पाय रुतल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
१६ मार्च रोजी सायंकाळी घडली. अमजद अजनेर खॉं पठाण वय १५ वर्षीय मृत तरुणाचे नाव असून या घटनेने खळबळ उडाली आहे. तांबोळे येथील अमजद अजनेर खॉं पठाण हा तांबोळे शिवारात शेळ्या चारण्याचे काम करतो. बुधवारी शेळ्या चारत असताना, तो डोहात पोहण्यासाठी गेला. परंतू पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाय चिखलात रुतला आणि त्यांच्या बुडून मृत्यू झाल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे.
तातडीने घटनास्थळी थाव घेऊन बाहेर काढून चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू डॉक्टरानी त्याला तपासून मृत घोषीत केले. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला वैद्यकिय आधिकारी यांच्या खबरीवरुन आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहे कॉ.प्रविण सांगळे करीत आहेत.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम