स्पा सेंटरवर नोकरी करणारया महिलेवर मालकाने केला अत्याचार

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १६ मार्च २०२२ | महिलांवरील अत्याचाराच्या घटना काही केल्याने कमी होत नाहीत. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत असल्याचे दिसतेय. जळगावात आलेल्या परप्रांतीय २८ वर्षीय महिलेवर मालकानेच अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हरियाणा राज्यातून २८ वर्षीय महिला ही कामाच्या निमित्ताने जळगावात वास्तव्याला आहे. पोट भरण्यासाठी आलेल्या महिलावर अत्याचार वाढत आहे. ती रिंगरोडवरील सी सल्ट स्पा सेंटरवर नोकरीला आहे. दत्तू लक्ष्मण माने हा स्पा सेंटरचा मालक आहे. त्याने महिलेकडून मसाज करून घेतला. त्यावेळी त्याने महिलेशी जबरदस्ती करून तीच्यावर अत्याचार केला. हा प्रकार कुणाला सांगितला तर उरलेला पगार देणार नाही अशी धमकी दिली. त्यानंतर दुकानातील मॅनेजर दिपक बडगुजर आणि पंकज जैन यांनी देखील अंगाला हात लावून विनयभंग केला. त्यानंतर महिलेला कामावरून काढून टाकण्यात आले.

याप्रकरणी महिलेने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी दत्तू लक्ष्मण माने रा. नाशिक, दिपक बडगुजर आणि पंकज जैन दोन्ही रा. जळगाव यांच्या विरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि किशोर पवार करीत आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like