उन्हाळ्याच्या सुरुवातीला चाराच्या शोधात मेंढपाळ्याची भटकंतीला सुरूवात
खान्देश लाईव्ह | १६ मार्च २०२२ | शेतीबरोबर होणाऱ्या विविध जोड-व्यवसायांमध्ये पशुपालन व पशुसंर्वधनात मेंढी पालन हा स्वतंत्र प्रकार आहे. जळगावा शहरातील रावेर तालुक्यातील शेत शिवारात शेतकऱ्यांच्या शेतातील पिके निघाल्यानंतर मेंढ्या चारण्यासाठी शेत दिल जाते. अनेक गावोगावी रामाचा पल्ला पार करत असतात. कधी या गावी कधी दुसऱ्या गावी. भटकंती करावी लागते. मेंढपाळ भर उन्हात जिवाचे रान करताना असतात तसेच एक चित्र खिर्डी परिसरात दिसुन आले.
जळगाव जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही या परिसरात अनेक ठिकाणी मेंढपाळांचा मुक्काम दिसून येत आहे. वर्षातून पाच ते सहा महिने या मेंढपाळांची मेंढ्या चारण्यासाठी भटकंती सुरू असते. ऊन वारा पाऊस अनेक परिस्थितीतून अडचणींवर मात करत मेंढपाळ आपला उदरनिर्वाह करत असतात. राज्यातील तापमान वाढ होताना दिसते. सध्या आता कडकडाक्याच्या उन्हात मेंढपाळ या परिसरातील शेतांमध्ये चाऱ्यांचा शोधात येतात. ज्या शेतकऱ्यांनी शेतातील पिके काढल्यावर रिकामे होतात. शेतात अनेक ठेलारी, मेंढपाळ आपल्या मेंढ्या चारण्यासाठी दरवर्षी रावेर तालुक्यात व गावागावात येत असतात.
कडक उन्हात देखील अनवाणी फिरतात. ज्या भागात शेती शिवाराच्या परिसरात पाण्याची सोय असेल तिथे मोकळ्या शेतात आपले संसार थाटतात. जेथे चारा सापडेल त्या शिवारात मेंढपाळ आपल्या मेंढ्या चारत असतात. शेतकरी आपल्या शेतात लेंडी खत आणि मूत्र मिळावे म्हणून मेंढपाळांना मेढ्या मुक्काम ठेवण्यासाठी पाचशे ते सहाशे रुपये देण्यात येतात. किंवा केवळ चराईवर शेतात मेंढ्या बसवत असतात. तसेच या परिसरात मेंढपाळाचा मुक्काम राहत असल्याचे चित्र सध्या आपणास दिसून येत आहे.सगळ्या प्रकारच्या वातावरणात निवारा नसतानाही उघड्या शेतामध्येच आपला संसार थाटून हे मेंढपाळ आपला उदरनिर्वाह करतात
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम