समाज मंदिर समाजप्रबोधनाचे ऊर्जाकेंद्र झाली पाहिजे – मुकुंद सपकाळे

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह। ११ एप्रिल २०२२ ।  समाज मंदिर प्रबोधनाचे केंद्र झाली पाहिजे असे प्रतिपादन महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी समाज मंदिर फलक अनावरण सोहळ्या प्रसंगी  केले.

वाघ नगर परिसरात सावखेडा ग्रामपंचायत  मधील सदस्या मायाताई पितांबर अहिरे यांच्या प्रयत्नाने वाघनगरवासीयांसाठी समाज मंदिरासाठी सावखेडा ग्रामपंचायत मधुन खुला भूखंड मंजूर करण्यात आलेला आहे.  राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधून समाज मंदिराच्या नामफलकाचे अनावरण महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्या मायाताई अहिरे तर प्रमुख पाहुणे हमाल मापाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष धुडकू सपकाळे, ग्रामपंचायत सदस्य मंगेश पानपाटील, संतोष पाटील, राकेश पाटिल , अमोल कोल्हे , दिलीप सपकाळे , रमेश सोनवणे , वाल्मीक सपकाळे ,  संजय सपकाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
 उपस्थितांना संबोधित करतांना मुकुंद सपकाळे पुढे म्हणाले, की समाज मंदिरामध्ये सुसज्ज ग्रंथालय असले पाहिजे त्यातून राष्ट्रहित, समाज हिताची चळवळ उभी राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातला भारत घडेल अशी कृती या समाज मंदिराच्या माध्यमातून झाली पाहिजे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पी.एन. पवार, अजित भालेराव, सुनील साळवे, सिद्धार्थ सोनवणे, मिलिंद गाढे, पंडित सपकाळे, एस यु तायडे, योगेश नन्नवरे, राष्ट्रपाल सुरडकर, युवराज सुरवाडे, बाबुराव इंगळे, प्रा. हनवते, सुशलर भालेराव, सुनिल सरदार , सत्यजित बिऱ्हाडे , संजय जाधव,
यांनी परिश्रम घेतले .
बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like