गो.पु.पाटील महाविद्यालयात महात्मा फुले यांच्या १९५ व्या जयंतीदिनी अभिवादन

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह। ११ एप्रिल २०२२ । कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत,गोपीचंद पुना पाटील,कनिष्ठ महाविद्यालय,कोळगाव ता.भडगाव येथे सत्यशोधक,थोर समाज सुधारक,शेतकऱ्यांचे कैवारी,स्री शिक्षणाचे उद्गाते “महात्मा ज्योतिराव फुले” यांना १९५ व्या जयंतीनिमीत्त विनम्र अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमप्रसंगी प्राचार्य सुनिल पाटील,पर्यवेक्षक अनिल पवार,ज्येष्ठ शिक्षक रामदास कुंभार,कनिष्ठ महाविद्यालयीन कार्यवाहक रघुनाथ पाटील यांच्या हस्ते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करुन त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.
सदर प्रसंगी प्राचार्य सुनिल पाटील व पर्यवेक्षक अनिल पवार या दोघांनी आपल्या मनोगतातून विद्येविना मती गेली,मतीविना नीती गेली,नीतीविना गती गेली,गतीविना वित्त गेले,वित्ताविना शुद्र खचले,इतके अनर्थ एका अविद्येने केले,असे परखड समाज प्रबोधन करणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुलेंबद्दल आपले अनमोल विचार उपस्थितांसमोर व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आबासाहेब कोळगावकर यांनी केले तर सुत्रसंचालन एस.ए.वाघ तसेच आभार प्रदर्शन प्रविण बोरसे यांनी मानले,कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बंधु-भगिनींनी मोलाचे सहकार्य केले.
बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like