पलोड स्कूलमध्ये ‘लॉन्चिंग ग्लोरीज २०२२’ सोहळा संपन्न

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह। ११ एप्रिल २०२२ । विवेकानंद प्रतिष्ठान संचालित काशिनाथ पलोड  पब्लिक स्कूलच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा  निरोप समारंभ या वेळेस अगदी नावा पासूनच वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला .या वेळेस या कार्यक्रमाचे नाव निरोप समारंभ असे प्रचलित नाव न ठेवता  लौंचिंग ग्लोरी सेरेमनी असे ठेवण्यात आले.  नर्सरी पासून ते दहावीपर्यंत  विवेकानंद प्रतिष्ठानच्या मुलभूत तत्वा नुसार सर्वांग अष्टपैलू व्यक्तित्व घडवले जाते. हे संस्कार घेऊन ती मुले समाजात स्थापित करून  एक नवे अथांग असे मुक्त आकाश यांच्या प्रगतीसाठी खुले झालेआहे हे या भूमिकेतून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

 

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विवेकानंद प्रतिष्ठान चे सचिव श्री राजू दादा नन्नवरे, शालेय समितीचे अध्यक्ष श्री  धनंजय जकातदार, व्यवस्थापक मंडळाचे सदस्य श्री. विनोद पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे आणि शाळेचे प्राचार्य श्री  गणेश पाटील शाळेच्या समन्वयिका सौ. संगीता तळेले यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले. यानंतर इयत्ता नववी दहावीच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यामध्ये तेजस माळी यांनी नृत्य सादर केले तर नमन खंडेलवाल याने कविता सादर केली,आदित्य उत्तरदे गिटार वादन सादर केले तर इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी एक छोटीसी नाटिका सादर केली. यानंतर विद्यार्थी प्रतिनिधी मृण्मयी चौधरी व आदित्य अत्तरदे  व शुघ्ना टेंबरे यांनी शाळा व शाळेतील शिक्षक यांच्यामुळे आपले व्यक्तिमत्व कसे बदलत गेले हे आपल्या मनोगतातून व्यक्त केले तर शिक्षकांच्या वतीने श्री अतुल मनोहर, सौ.वंदना चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले .

 

शाळेचे प्राचार्य श्री. गणेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी व व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक असणारे फाईव सी याविषयी सांगून त्याची रुजवणूक आपल्या मध्ये कशी करता येईल हे सांगितले. विवेकानंद प्रतिष्ठानचे सचिव श्री .राजू दादा नन्नवरे यांनी जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ध्येय ,शिस्त, आणि मेहनत या तीन गोष्टींचे महत्त्व सांगून आपल्या जीवनात कसे अंगीकारले पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून विविध स्पर्धांमध्ये विजयी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला  तर अखिल भारतीय नागरिक विकास केंद्र औरंगाबाद यांच्यातर्फे शाळेचे प्राचार्य श्री. गणेश पाटील  यांना आदर्श मुख्याध्यापक व सर्वोत्कृष्ट शाळा तर सौ. चित्रा पाटील, श्री. विकास कोळी ,श्री.योगेश पाटील यांना आदर्श शिक्षकांचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमासाठी विवेकानंद प्रतिष्ठान च्या अंतर्गत असणाऱ्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक श्री. ज्ञानेश्वर पाटील श्री . पद्माकर इंगळे ,श्री. जगदीश चौधरी, श्री. जयंत टेंबरे , श्री. शशिकांत पाटील, श्री. हेमराज पाटील ,श्री .किशोर पाठक, व्यवस्थापकीय अधिकारी श्री. दिनेश ठाकरे, श्री.मिलिंद पुराणिक हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूमी देशमुख व प्रांजल जगताप यांनी केले .तर आभार प्रदर्शन सौ .संगीता तळेले यांनी केले.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like