विद्यापीठात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I १ डिसेंबर २०२२ I कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील जैवशास्त्र प्रशाळेतील प्रोफेसर ए. बी. चौधरी, भौतिकशास्त्र प्रशाळेतील सहयोगी प्राध्यापक डॉ. रत्नाकर गोरे व विद्यापीठाच्या ज्ञानस्त्रोत केंद्रातील सहायक सरोजिनी वाघोदे हे तिघे ३० नोव्हेंबरला विद्यापीठ सेवेतून निवृत्त झाल्याबद्दल कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.

प्रा. ए. बी. चौधरी हे गेल्या २३ वर्षापासून जैवशास्त्र प्रशाळेत कार्यरत होते. मध्यंतरी त्यांनी अधिष्ठाता, प्रभारी कुलसचिव, प्रभारी परीक्षा नियंत्रक म्हणून ही काम पाहिले होते. प्रा. रत्नाकर गोरे हे १९९२ मध्ये विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र प्रशाळेत रूजू झाले होते. तर श्रीमती सरोजिनी वाघोदे यांनी विद्यापीठात २२ वर्ष सेवा बजावली.

कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी या तिघांच्या विद्यापीठ सेवेचा गौरव केला व स्मृतीचिन्ह दिले. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like