घरफोडी करणाऱ्या आरोपीला सापळा लावून पकडले ; एलसीबीची कारवाई
खान्देश लाईव्ह I १ डिसेंबर २०२२ I शहरातील घरफोडीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांबापूरा येथून गुरूवारी १ डिसेंबर रेाजी दुपारी २ वाजता अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी रामानंदनगर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
रामानंदनगर पोलीस ठाण्यात घरफोडीच्या दाखल गुन्ह्यातील आरोपी हा तांबापूरा परिसरात असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. गुरूवारी १ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता पथकातील विजयसिंग पाटील, सुधाकर आंभोरे, जितेंद्र पाटील, अकरम शेख , महेश महाजन, नितीन बाविस्कर, विजय एस पाटील, प्रीतम पाटील, अविनाश देवेर यांनी कारवाई करत संशयित आरोपी इस्तीयाक अली राजकी अली रा. तांबापूरा जळगाव याला तांबापूरा येथून अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी त्याला रामानंद नगर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम