यावल पंचायत समितीचा गटविकास अधिकारी अजय चौधरी यांनी स्वीकारला पदभार

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I ३० नोव्हेंबर २०२२ I येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी म्हणुन पुनश्च प्रभारी गटविकास अधिकारी म्हणुन भुसावळचे गटविकास अधिकारी अजय चौधरी यांनी कार्यभार स्विकारला आहे.

यावल पंचायत समितीचे कार्यरत असलेले एक अभ्यासु प्रभारी गटविकास अधिकारी व अमळनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणुन कार्यभार सांभाळणारे एकनाथ चौधरी नाशिक येथे शासकीय कामानिमित्ताने जात असतांना धरणगाव अमळनेर दरम्यान त्यांच्या शासकीय वाहनाचा भिषण अपघात होवुन त्यात त्यांचा जागेवरच दुदैवी मृत्यु झाला होता. त्यांच्या अशा अपघाती मृत्युमुळे रिक्त असलेले पंचायत समितीच्या गटविकास अधिकारींच्या रिक्त पदावर प्रदीर्घ आरोग्य सेवेचे कारभार सांभाळणारे अजय चौधरी यांची पदोन्नती झाली. त्यांच्याकडे भुसावळ व यावल पंचायत समितीच्या प्रभारी गटविकास अधिकारी पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अजय चौधरी यांनी दिनांक २९नॉव्हेबर रोजी यावल पंचायत समितीच्या प्रभारी गटविकास अधिकारी पदाची सुत्रे स्विकारली असुन यावेळी त्यांचे स्वागत यावल तालुका ग्रामसेवक संघटनेचे तालुका अध्यक्ष रूबाब तडवी, तालुका सचिव पी.व्ही. तळेले, ग्रामसेवक हितेन्द्र महाजन, उल्हास पाटील, जिल्हा ग्रामसेवक पतपेठीचे व्हाईस चेअरमन भाईदास पारधी यांनी त्यांचे स्वागत केले व त्यांना प्रशासकीय कार्यात पुर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

 

 

 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like