व्हाट्सपवरून मुलीला वारंवार संदेश ; गुन्हा दाखल
खान्देश लाईव्ह I १७ डिसेंबर २०२२ I तालुक्यातील साकळी गावातील एका २० वर्षीय तरूणीला एका अज्ञात तरुणाकडुन मोबाईलवर वारंवार संदेश पाठवुन व विचारणा केल्यावरून अश्लील शिवीगाळ करणाऱ्या विरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशी की साकळी गावात राहणाऱ्या एका विस वर्षीय तरूणीला ९५२९०२२५८५या व्हाट्स अॅप क्रमांकाच्या मोबाइलवरून एका अज्ञात मोबाइलधारका कडुन वारंवार संदेश पाठवले या संदर्भात तरूणीने संदेश पाठवणाऱ्यास त्याचे नांव विचारले असता त्या संदेश पाठवणाऱ्या तरुणाकडुन तरूणीस अश्लील शिवीगाळ करीत विनयभंग केले. या वारंवार येणाऱ्या संदेशांमुळे डोकेदुखी वाढल्याच्या त्रासाला कंटाळुन अखेर साकळीच्या त्या तरूणीने यावल पोलीस ठाण्यात त्या संदेश पाठवणाऱ्या अज्ञात तरुणा विरूद्ध फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास यावलचे पोलीस निरिक्षक राजेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक प्रदीप बोरूडे व पोलीस करीत आहे .
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम