पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा चाळीसगावात निषेध
खान्देश लाईव्ह I १७ डिसेंबर २०२२ I पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी चाळीसगावात आज भाजपा आक्रमक होत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोडामारो आंदोलन करीत निषेध केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नुकतीच पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो झरदारी यांनी अश्लील विधान केले. त्यानंतर याचे पडसाद देशभरात उमटले जात असून बिलावल झरदारी व पाकिस्तानच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर चाळीसगाव येथे शनिवार रोजी भाजपा व अल्पसंख्याक आघाडीच्या वतीने झरदारी यांचा पुतळा जाळला व प्रतिमेला जोडामारो आंदोलन करण्यात आला.
यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद यांच्यासह विविध घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. तत्पूर्व आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध नोंदविण्यात आला.
या जोडामारो आंदोलनात भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के. बी. साळुंखे, जेष्ठ नेते उध्दवराव महाजन, तालुकाध्यक्ष प्रा. सुनील निकम, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील यांच्यासह भारतीय जनता पक्षांसह अल्पसंख्याक मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम