गुरे चोरणारी टोळीचा पर्दाफाश ; एलसीबीची कारवाई
खान्देश लाईव्ह I १७ डिसेंबर २०२२ I जिल्ह्यात विविध भागातून गुरांची चोरी करणाऱ्या टोळीचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला असून टोळीतील तीन संशयित आरोपींना अजिंठा चौक परिसरातून दोन चारचाकींसह अटक केली आहे. जळगाव जिल्ह्यातील १९ गुन्हे उघडकीला आले असून पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती जळगाव जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांनी शुक्रवारी १६ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता पत्रकार परिषदेत दिली.
जळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून गेल्या काही दिवसांपासून गुरांची चोरी होत असल्याबाबत अनेक गुन्हे दाखल होते. यासंदर्भात गुरे चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्याच्या सुचना पोलीस अधिक्षकांनी दिले. त्यानुसर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाई केली. यात धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील मोहंमद फयाज मोहंमद अयाज हा अजिंठा चौकात स्कॉर्पीओ कार क्रमांक (एमएच १२ बीव्ही ९४१५) घेवून उभा असल्याची गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने कारवाई करत ताब्यात घेतले. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने साथीदारांच्या मदतीने गुरे चोरी केल्याची कबुली दिली. यात वसीम मोहमंद अस्लम कुरेशी आणि नईम शेख कलीम दोन्ही रा. मासुमवाडी यांना देखील अटक केली आहे. तर जाफर गुलाबर नबी रा. पाळधी ता.धरणगाव, हारून उर्फ बाली शहा रा. धुळे, अरशद रा. धुळे, आणि मनोज उर्फ मोन्या विठ्ठल पाटील रा.कुसुंबा ता.जळगाव असे इतरांचे नाव निष्पन्न झाले असून त्यांचाही शोध सुरू आहे. या कारवाईत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकुण ३ जणांना अटक केली असून दोन स्कॉर्पीओ वाहने जप्त केली आहे.
जामनेर -१, भडगाव-२, अमळनेर-३, एरंडोल-२, पारोळा-२, चोपडा-१, जळगाव तालुका-३, मुक्ताईनगर-४, पाचोरा-१ असे एकुण १९ गुन्हे उघडकीला आले आहे. संशयित आरोपींकडून अजून गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम