माहेरहून ५ लाखांची मागणी करत छळ
खान्देश लाईव्ह I १७ डिसेंबर २०२२ I जळगाव तालुक्यातील कानळदा येथील माहेर असलेल्या विवाहितेला डंपर घेण्यासाठी माहेरहून ५ लाखांची मागणी करत छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भात गुरुवार १५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील कानळदा येथील माहेर असलेल्या भावना पंकज कोळी (वय-२२) यांचा विवाह २०१९ मध्ये एरंडोल तालुक्यातील सावदा येथील पंकज गुलाब कोळी यांच्याशी रीतीरिवाजानुसार झाला. दरम्यान काहीही कारण नसताना तिला उपाशीपोटी ठेवून शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच माहेरहून डंपर घेण्यासाठी ५ लाखांची मागणी केली. विवाहितेने पैशांची पूर्तता न केल्यामुळे तिचा अधिक छळ सुरू झाला. हा छळ सुरू असताना सासरच्या मंडळींनी देखील पैशांसाठी तगादा लावला. अखेर विवाहिता कंटाळून माहेरी निघून आल्या. दरम्यान या प्रकरणी गुरुवारी १५ डिसेंबर रोजी विवाहितेने जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम