भुसावळच्या दाम्पत्याचा गुजरातमधील भीषण अपघातात मृत्यू

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I १७ डिसेंबर २०२२ I भुसावळ शहरातील गंगाराम प्लॉट भागातील रहिवासी असणार्‍या दाम्पत्याचा गुजरातमधील भीषण अपघातात मृत्यू झाला आहे.

गंगाराम प्लॉट भागातील रहिवासी असणारे रवी नाले (वय ६३) आणि त्यांच्या सौभाग्यवती ललीता नाले ( वय ६०) हे अहमदाबादमधील मणीनगर येथे नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी आले होते. त्यांचा मणिनगर येथे झालेल्या अपघातात मृत्यू झाला.

दरम्यान, या भीषण अपघाताची माहिती मिळताच गंगाराम प्लॉट परिसरावर शोककळा पसरली. आज सकाळी या दाम्पत्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like