राहुरी कृषी विद्यापीठात उद्या ‘इद्रधनुष्य’ युवक महोत्सव ; ४० जणांचा संघ रवाना

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | 3 नोव्हेंबर २०२२ |  राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ ‘इद्रधनुष्य’ युवक महोत्सव उद्या दि. ४ नोव्हेबर पासून महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे सुरु होत असून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ४० जणांचा संघ या महोत्सवासाठी रवाना झाला आहे. दरम्यान यातील सहभागी विद्यार्थ्यांना दोन दिवस विद्यापीठात प्रशिक्षण देण्यात आले.

राहुरी येथे ९ नोव्हेंबर पर्यंत इंद्रधनुष्य युवक महोत्सव होत असून २२ विद्यापीठे यात सहभागी होत आहे. लोकनृत्य, शास्त्रीय नृत्य, प्रश्न मंजूषा, वादविवाद, चित्रकला, कोलार्ज, पोस्टर, मातीकला, व्यंगचित्रे, स्थळ छायाचित्रण आणि रांगोळी अशा कला प्रकारात जळगाव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील ३१ विद्यार्थी, ०७ साथीदार आणि ०२ संघव्यवस्थापक सहभागी होत आहे. या सहभागी कलावंतांनाा विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने १ व २ नोव्हेंबर रोजी प्रशिक्षण देण्यात आले. साहित्य प्रकारासाठी प्रा. आशुतोष पाटील, चित्रकार राजू बाविस्कर, नृत्य दिग्दर्शिका अपर्णा भट, लोकनृत्य प्रशिक्षक नाना सोनवणे, तबला वादक तेजष मराठे, प्रा. पियुष बडगुजर, प्रा. अजय शिंदे, प्रा. कपिल शिंगाणे, प्रा. देवेंद्र गुरव यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. शिबिराचे उद्घाटन प्रा. अनिल डोंगरे यांनी केले. तर प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे यांच्या उपस्थितीत समारोप झाला. शिबीराचे आयोजन विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक डॉ. सुनील कुलकर्णी यांनी केले. संघ व्यवस्थापक म्हणून प्रा. विजय लोहार, डॉ. रूपाली चौधरी काम पाहत आहेत.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like