निबंध लेखन स्पर्धेत जितेंद्र क्षीरसागर प्रथम

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | 3 नोव्हेंबर २०२२ | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा अभ्यास प्रशाळा आणि संशोधन केंद्रातर्फे घेण्यात आलेल्या निबंध लेखन स्पर्धेत समाजकार्य विभागाचा विद्यार्थी जितेंद्र क्षीरसागर याने प्रथम क्रमांक प्राप्त केला.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त ही निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आली. रसायन शास्त्र प्रशाळेचा धवल सुर्यवंशी याने द्वितीय क्रमांक प्राप्त केला तर नाहाटा महाविद्यालय, भुसावळची सायली महाजन आणि संख्याशास्त्र प्रशाळेच्या सामिया पठाण या दोघींना तृतीय पारितोषिक विभागून देण्यात आले. डॉ. मनिषा इंदाणी डॉ. लिलाधर पाटील यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. २८ विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला अशी माहिती प्रशाळेच्या संचालक प्रा. मुक्ता महाजन यांनी दिली. डॉ. प्रिती सोनी आणि बाळासाहेब सुर्यवंशी यांनी स्पर्धेचे नियोजन केले.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like