शिक्षक कवयित्री संध्या भोळे रचित ‘जावे गुंफित अक्षरे’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन 

बातमी शेअर करा

 

खान्देश लाईव्ह I ३० नोव्हेंबर २०२२ I येथील तु. स. झोपे गुरूजी प्राथमिक विद्या मंदिरातील शिक्षिका तथा नवोदित कवयित्री संध्या भोळे रचित ‘जावे गुंफित अक्षरे’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते पार पडले. खानदेशातील सुप्रसिद्ध साहित्यिक बाबासाहेब के. नारखेडे यांच्या कर्मभूमीत नवोदित कवयित्रीने आपल्या प्रतिभासंपन्नतेचे दर्शन घडवले असल्याचे मान्यवरांनी मनोगतात व्यक्त केले.

पुस्तक प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षस्थानी खामगाव येथील प्रसिद्ध साहित्यिक प्रा. देवबा पाटील तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून अंबरनाथ येथील साहित्यिक सरवाकार प्राचार्य किसन वराडे, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी पी. व्ही. पाटील, माजी नगराध्यक्ष प्रमोद नेमाडे, मुख्याध्यापक सुनील वानखेडे, ललितकुमार भोळे व कवयित्री सौ. संध्या भोळे उपस्थित होते. प्रारंभी दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनानंतर नवोदित कवयित्री संध्या भोळे यांनी लेखनामागची भूमिका मांडली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला. प्रा. डॉ. जतीन मेढे म्हणाले की, बहिणाबाईंचे काव्य अजरामर झाल्यामुळे अनेक लेकी लिहू लागल्या आहेत. त्यांच्या सकस लेखनाचा परिणाम नवोदित कवयित्री संध्या भोळे यांच्यावरही पडला असून त्यांच्या कवितांमधून हा वारसा जपला गेला आहे.

तु. स. झोपे गुरुजी प्राथमिक विद्या मंदिराच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राहुल भारंबे यांनी केले. कार्यक्रमानंतर सायंकाळी माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे, प्रा. डॉ. सुनील नेवे, पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे, प्रा. शैलेश राणे यांनी संध्या भोळे यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहाचे अभिनंदन करून कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like