आदिवासी पाडा येथे ब्लँकेट वाटप

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I ३० नोव्हेंबर २०२२ I जळगाव जिल्हा मन्यार बिरादरी व सखी श्रावणी महिला उद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने यावल तालुका मधिल वड्री धरणा जवळ,आसराबारी येथिल आदिवासी पाडा येथे आदिवासी भगिनींना ब्लॅंकेट व लहान मूलांना खाऊ चे वाटप करण्यात आले,
संस्थे तर्फे दर वर्षी हिवाळ्यात गरजुंना, अपंग बांधवांना व आदिवासी पाड्यावर राहणारे बांधवांना मायेची ऊब मिळावी म्हणुन दोन्ही संघटना वेगवेगळी मदत करीत असे परंतु राष्ट्रीय एकात्मता कार्यक्रमा अंतर्गत सयुक्त विद्यमाने पाड्यावरील भगिनींना कांबळ व बालकांना खाऊ वाटप करणेत आला,
यावेळी संस्थाचे अध्यक्षा राजश्री नेवे, माया चौधरी, वंदना झांबरे, स्मिता माहुरकर, आशा पाटील, मिनाक्षी दलाल, अरिफा अल्लादिन हे संस्था चे पदाधिकारी उपस्थीत होते, अल्लादिन तडवी व नितिन माहुरकर यांचे मार्गदर्शन लाभले, मणीयार बिरादरी चे अध्यक्ष फारुख शेख यांचे अनमोल सहकार्य व मार्गदर्शन लाभले.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like