ध्रुव भंगाळे ‘प्रधानमंत्री यशस्वी प्रवेश परीक्षेत जिल्ह्यात प्रथम !

खान्देश लाईव्ह I ३० नोव्हेंबर २०२२ I पोदार इंटरनॅशनल स्कूल, जळगाव येथील इयत्ता ९वीचा विद्यार्थी कुमार ध्रुव जितेंद्र भंगाळे, ‘प्रधानमंत्री यशस्वी प्रवेश परीक्षे’त जळगाव जिल्ह्यात प्रथम व महाराष्ट्रात 26 वा क्रमांक मिळवून पुरस्कारासाठी पात्र झाला.
ध्रुव जितेंद्र भंगाळे यास शासनाद्वारे मिळणाऱ्या दीड लाखाच्या रोख रक्कम सहित यंग अचीवर कॉलरशिप पुरस्कार प्राप्त झाला आहे.
शाळेचे प्राचार्य श्री गोकुळ महाजन यांनी त्याच्या यशस्वीतेचं कौतुक करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्याचे पालक सौ.पूनम व श्री. जितेंद्र भंगाळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
मुख्याध्यापकांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांनी शासनाद्वारे मिळणाऱ्या स्कॉलरशिप स्पर्धा परीक्षेबद्दल मार्गदर्शन करून विविध संकेतस्थळावर भेट देण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी पोदार जम्बो किड्सच्या मुख्याध्यापिका सौ. उमा वाघ, उप-मुख्याध्यापक श्री दिपक भावसार, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी त्यांनी विद्यार्थ्याचे कौतुक केले.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम