प्रांतपाल डॉ. झुनझुनवाला यांची रोटरी जळगाव वेस्ट क्लबला भेट

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I २८ नोव्हेंबर २०२२ I येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टला रोटरी डिस्ट्रीक्ट 3030 चे प्रांतपाल डॉ. आनंद झुनझुनवाला यांनी नुकतीच वार्षिक अधिकृत भेट दिली.
प्रारंभी अध्यक्ष व सचिवांसमवेत झालेल्या बैठकीत प्रांतपालांनी आगामी कार्याची दिशा दिली. त्यानंतर झालेल्या क्लब असेंब्लीमध्ये सर्व कमेटी चेअरमन यांनी केलेल्या कार्याचा त्यांना अहवाल सादर केला.
रोटरी जळगाव वेस्ट व जळगाव पीपल्स बँक रामदास पाटील स्मृती सेवा ट्रस्ट संचालित छत्रपती श्री शाहू महाराज हॉस्पीटलमधील माता-अमृत मदर मिल्क बँक प्रकल्पास प्रांतपालांनी भेट देऊन केलेल्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.
सायंकाळी मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे झालेल्या कौटुंबिक मिटींगमध्ये प्रांतपाल डॉ. आनंद झुनझुनवाला यांनी मार्गदर्शन केले. सहप्रांतपाल डॉ. मुर्तुझा अमरेलीवाला यांची विशेष उपस्थिती होती.
प्रास्ताविक अध्यक्ष सुनील सुखवानी यांनी केले. मानद सचिवांचा अहवाल प्रविण जाधव यांनी तर सूत्रसंचालन शंतनू अग्रवाल यांनी केले. गणेश वंदना डॉ. लीना नारखेडे यांनी तर आभार प्रेसिडेंट इलेक्ट सारिता खाचणे यांनी मानले.
कार्यक्रमास रोटरी डिस्ट्रिक्टच्या प्रथम महिला मोनिका झुनझुनवाला, रोटरी वेस्टच्या प्रथम महिला काजल सुखवानी, डिस्ट्रीक्ट जाँईट सेक्रेटरी योगेश भोळे, सहप्रांतपाल अरुण नंदर्षी, दिलीप गांधी, रोटरी क्लब जळगावचे अध्यक्ष राजेश वेद या मान्यवरांसह रोटरी वेस्टचे सर्व माजी अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्यांची परिवारासह मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like