जखनीनगरात दोन गटात हाणामारी ; गुन्हा दाखल

खान्देश लाईव्ह I २८ नोव्हेंबर २०२२ I शहरातील जाखनीनगर कंजरवाडा परिसरात तरुणाने केलेल्या आत्महत्या प्रकरणात दाखल अर्ज मागे घेण्याच्या वादातून रविवारी दुपारी दोन गटात तुफान हाणामारी झाली. याप्रकरणी एमआयडीसी पाेलिस ठाण्यात परस्परांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
सावन वजीर गागडे (वय ६७) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जयेश दिलीप माचरे यांचा भाऊ रितेश याने २० ऑक्टाेबर २०२२ला आत्महत्या केली हाेती. त्याबाबत गागडे कुटुंबीयांविरुद्ध पाेलिसांत तक्रार दिली आहे. रविवारी दुपारी गागडे हे बसलेले असताना शशिकांत दिलीप बागडे हा येथे येऊन शिवीगाळ करून फाेटाे काढले. संजय बाटुंगे, राहुल माचरे, आकाश माचरे, दीपमाला बाटुंगे, दिशा भाट, तमन्ना माचरे, रत्नाबाई बागडे, रितीक बागडे यांनी शिवीगाळ व व्हॅनचे नुकसान केले. घरात घुसून महिलांना मारहाण केली. दुसरी तक्रार श्रद्धा जयेश माचेकर (वय २५) यांनी दिली आहे. श्रद्धा या पती जयेश साेबत हाॅस्पिटलमधून परत येत असताना सावन गागडने तक्रार मागे घेण्याचे सांगितले. त्यानंतर सावन गागडेने जयेशच्या डाेक्यात दगड मारले. सुधीर याने मारहाण केली. विकास व राजू गागडे याने पाेटात लाथ मारली. घरात जाऊन नुकसान केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम