सहायक फौजदारावर फायटरने हल्ला !

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I २८ नोव्हेंबर २०२२ I शहरात भर दिवसा सहायक फौजदारावर फायटरने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, बाजारपेठ पोलीस स्थानकाचे सहायक फौजदार जिजाबराव पाटील हे आपल्या दुचाकीवरून जात असतांना त्यांच्या दुचाकीसमोर एक जण अचानक आला. यावर पाटील यांनी त्याला पाहून चालत जा असे सांगितले. यानंतर त्या तरूणाने अचानक फायटरने त्यांच्यावर हल्ला करून पळ काढला. या तरूणाचे नाव सोनू पांडे असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

ही घटना शहरातील वसंत टॉकीज परिसरात असलेल्या महाराणा प्रताप चौकात २१ रोजी घटली. जिजाबराव पाटील यांच्यावर रूग्णालयात उपचार करण्यात आल्यानंतर त्यांनी फिर्याद दिल्याने याबाबतचा गुन्हा शहर पोलीस स्थानकात दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, फायटरने हल्ला केल्यानंतर आरोपी फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार संजय कंखरे करीत आहेत.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like