पलोड स्कूलमध्ये प्राणी प्रकल्पाचे सादरीकरण

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I २८ नोव्हेंबर २०२२ I विवेकानंद प्रतिष्ठान संचलित, काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलमध्ये पूर्व प्राथमिक विभागात प्राणी प्रकल्प सादर करण्यात आला.
हा प्रकल्प आठवडाभर राबविण्यात आला.
दररोज विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्राण्यांची माहिती जसे की पाळीव प्राणी, जंगली प्राणी, पाण्यात राहणारे प्राणी, सरपटणारे प्राणी यांची माहिती देण्यात आली तसेच ,त्यांचे आवाज , त्यांची निवासस्थाने, त्यांचा आहार याविषयीची माहिती पावर पॉइंट प्रेझेंटेशन द्वारे दाखविण्यात आली.
विद्यार्थ्यांकडून प्राण्यांची चित्रे रंगवून घेण्यात आली तसेच क्राफ्ट पेपर पासून विविध प्राणी तयार करून घेण्यात आले.
प्रत्यक्ष प्राण्यांच्या प्रतिकृती व विद्यार्थ्यांच्या चित्र व हस्तकलेच्या वस्तूंचे प्रदर्शन मांडण्यात आले.
तसेच सीनियर केजी च्या विद्यार्थ्यांनी विविध प्राण्यांची माहिती सांगितली.
प्रकल्प प्रमुख सारिका कुलकर्णी होत्या.
कार्यक्रमाला समन्वयिका अनघा सागडे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले..

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like