जिल्हा वार्षिक योजनाअंतर्गत क्रीडांगण विकास अनुदान योजना

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ९ नोव्हेंबर २०२२ | जिल्हा नियोजन समिती, जळगांव यांच्या वतीने उपलब्ध होणाऱ्या अनुदान अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव मार्फत जिल्हा वार्षिक सर्वसाधारण / आदीवासी घटक कार्यक्रम / अनुसुचित जाती उपयोजना या योजनाअंतर्गत क्रीडांगण विकास अनुदान सन 2022-23 साठी अनुदान उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या योजनाअंतर्गत अनुदानीत शासकीय / संस्था संचलित अनुदानीत शाळा / कनिष्ठ महाविद्यालये / वसतीगृहे इत्यादी ज्यांना शिक्षण विभागाने / समाजकल्याण विभागाने मान्यता दिली आहे. अशा संस्था तसेच ग्राम पंचायत /नगरपालीका /महानगरपालीका इत्यादींना अनुदान उपलब्धतेनुसार मिळू शकेल. त्यासाठी ज्या अनुदानीत शाळा / महाविदयालय / वस्तीगृहे / स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडे फक्त क्रीडांगणासाठी जवळपास 1.5 एकर किंवा यापेक्षा जास्त किंवा विहित खेळांचे मैदाने तयार करण्यासाठी आवश्यक असलेली जागा उपलब्ध आहेत ते अनुदान प्राप्तीसाठी प्रस्ताव करु शकतात.

सदर योजनेअंतर्गत 1) क्रीडांगण समपातळीत करणे. 2) 200 मी. अथवा400 मी. धावनमार्ग तयार करणे. 3) क्रीडागणास भिंतीचे/ तारेचे कुंपण घालणे 4) विविध खेळांची एक किंवा अधिक प्रमाणित क्रीडांगण तयार करणे. 5) प्रसाधन गृह / बेजींग रूम बांधणे. 6) पिण्याच्या व मैदानावर मारण्यासाठी आवश्यक पाण्याची सुविधा निर्माण करणे. 7) क्रीडा साहीत्य ठेवण्यासाठी भांडारगृह बांधणे. 8) क्रीडांगणावर फ्लड लाईटची सुविधा निर्माण करणे, 9) क्रीडा साहीत्य खरेदी करणे. 10) क्रीडांगणावर मातीचा/सिमेंटचा भराव असलेली प्रेक्षक गॅलरी/आसन व्यवस्वा तयार करणे 11) प्रेक्षक गॅलरीवर / आसन व्यवस्थेवर शेड तयार करणे. 12) क्रीडांगणाभोवती ड्रेनेज व्यवस्था करणे.. 13) निर्मित सुविधा विचारात घेवून मैदानावर पानी मारण्यासाठी स्प्रिंकलर यंत्रणा बसविणे व मैदानावर रोलींग करण्यासाठी मिनी रोलर खरेदी करणे इत्यादी बाबींसाठी क्रीडा उपक्रमांची आवश्यता असल्याची खात्री केल्यानंतर अनुदान मंजूर करण्यात येते. वरील बाबींपैकी कोणत्याही एका बाबीसाठीच एक वर्षात अनुदान उपलब्धतेनुसार अनुदान मंजूर करण्यात येते. वर उल्लेखीत प्रत्येक बाबींकरीता ( प्रस्ताव एकाच बाबींकरिता करावा ) अंदाजीत खर्चाच्या 100 टक्के किंवा कमाल रु.7.00 लक्ष पर्यंतचे अनुदान या पैकी जी रक्कम कमी असेल इतकी रक्कम अनुदान म्हणुन देण्यात येईल. मात्र क्रीडा साहीत्यासाठी कमाल रु.3.00 लाख अनुदान मर्यादा राहील. क्रीडा साहीत्य मागणी प्रस्तावांसाठी शाळा / महाविदयालय / वस्तीगृहे यांच्याकडे सदर मैदाने / हॉल उपलब्ध असणे आवश्यक आहे.

सदर जिल्हा वार्षिक सर्वसाधारण / आदीवासी घटक कार्यक्रम व अनुसुचित जाती उपयोजना या योजनाअंतर्गत सन 2022-23 या वर्षासाठी अनुदान मागणीचे प्रस्ताव मागविण्यात येत असून सदर योजनेचा लाभ / फायदा घेवू इच्छिणाऱ्या सर्व शासकीय / संस्था संचलित अनुदानीत शाळा / कनिष्ठ महाविद्यालये/ वस्तीगृहे इत्यादी ज्यांना शिक्षण विभागाने समाजकल्याण विभागाने मान्यता दिली आहे व स्थानिक स्वराज्य संस्था यांनी अनुदानचं मागणीचे प्रस्ताव सादर करणे संदर्भात अर्जाचा विहीत नमुना व अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगांव येथे दिनांक 25 नोव्हेंबर, 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत संपर्क साधुन त्याच कालावधीत परिपूर्ण प्रस्ताव हा ऑन लाईन ( On Line ) व्दारे jalgaonsports.in या वेबसाईट वर अपलोड करुन व अपलोड केलेला प्रस्तावाची प्रिंट काढून ती प्रत व मुळ कागदपत्र असलेला प्रस्ताव असे मुळ प्रतीत प्रस्ताव अर्जासोबत असलेल्या यादीनुसार योग्य त्या कागदपत्राच्या पूर्ततेसह सादर करावेत. सदर योजनांतर्गत प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांपैकी अल्पसंख्यांक मुले / मुली यांच्यासाठी कार्यरत संस्थांना अनुदान देणेबाबत प्रथम प्राधान्य देण्यात येईल. त्यामुळे वरील दिलेल्या विहित मुदतीतच प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, मिलिंद दिक्षीत यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like