राज्यात १७ हजार १३० जागांसाठी पोलीस भरती

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ९ नोव्हेंबर २०२२ | महाराष्ट्र पोलीस विभागात 17130 जागांसाठी भरती होणार आहे. यात पोलीस शिपाई आणि चालक पोलीस शिपाई पदांसाठी ही भरती होणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 9 नोव्हेंबरपासूनच पोलीस भरतीसाठी उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे.. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 17130

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) पोलीस शिपाई 14956
शैक्षणिक पात्रता : इयत्ता 12वी उत्तीर्ण.

2) चालक पोलीस शिपाई 2174
शैक्षणिक पात्रता : (i) इयत्ता 12वी उत्तीर्ण. (ii) हलके वाहन चालक परवाना (LMV-TR)

वयाची अट: 30 नोव्हेंबर 2022 रोजी, [मागास प्रवर्ग: 05 वर्षे सूट]
पोलीस शिपाई: 18 ते 28 वर्षे.
चालक पोलीस शिपाई: 19 ते 28 वर्षे.

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – ३० नोव्हेंबर २०२२

शारीरिक पात्रता:

पुरुष :
उंची – 165 सेमी पेक्षा कमी नसावी
छाती – न फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी
महिला :
उंची – 158 सेमी पेक्षा कमी नसावी

अर्ज फी – (Police Bharti 2022)

खुला प्रवर्ग: रु. 450 /-
मागास प्रवर्ग: रु. 350 /-

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like