पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये ८० पैशांची वाढ

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ३१ मार्च २०२२ | देशभरात मागील अनेक दिवसांपासून पेट्रोल व डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ आहे. दररोज पैशांमध्ये होणारी वाढ ही आता सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. देशात आज पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये प्रत्येकी ८०-८० पैशांची वाढ झाली आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलीटर ८० पैशांची वाढ झाली आहे. गेल्या १० दिवसांत नवव्यांदा इंधनाचे दर वाढले आहेत. यामुळे फक्त गेल्या १० दिवसांत इंधन तब्बल ६ रुपये ४० पैशांनी महागलं आहे. पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज वाढू लागल्यावर आता याचा परिणाम आपल्या महागाईवर होणार, वस्तूंच्या किमती वाढणार अशी भीती व्यक्त केली जात आहे.

पाच राज्यांच्या निवडणुकांमुळेच हे दर आतापर्यंत स्थिर ठेवले होते आणि निकालानंतर ते वाढवले असा आरोप विरोधकांकडून होत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मात्र यामागे फक्त युक्रेन-रशिया युद्धच असल्याचं ठामपणे सांगितलं आहे.देशभरातील जवळपास सर्वच महानगरांमध्ये पेट्रोलच्या किमतीने शंभरचा टप्पा पार केला आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये पेट्रोलच्या दरामध्ये लिटरमागे तब्बल 6. 84 रुपयांची वाढ झाली आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like