सनपुले येथील तरुणाचा तापी नदीत बुडून मृत्यू
खान्देश लाईव्ह | ३१ मार्च २०२२ | जळगावात चोपडा तालुक्यातील सनपुले येथील १९ वर्षीय तरुणाचा तापी नदीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अपघाताचा अनेक घटना परिसरात घडताना दिसत आहे.
देवेंद्र हा शेतीचे काम करून अंघोळ करण्यासाठी बुधवारी रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास नदीवर गेला होता.१९ वर्षीय देवेंद्रला खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास तापी नदीच्या पात्रात पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना नदी पात्रात मासेमारी करणाऱ्या एका महिलेला दिसली. त्या महिलेने गावात निरोप दिल्यानंतर नागरिकांनी धाव अर्ध्या तासांनी त्याला बाहेर काढले. उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.
शवविच्छेदन करून रात्री नऊ वाजता शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार झाले. त्याच्या पश्चात आई, वडील, एक लहान भाऊ असा परिवार आहे. सनपुले येथील पांडुरंग कोळी, दिनेश कोळी, कैलास माळे, नाना माळे, अतुल पाटील, वासुदेव कोळी, समाधान कोळी, काशिनाथ पवार यांनी मदतकार्य केले. घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम