फोन टॅपिंग प्रकरण : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंची होणार चौकशी
फोन टॅपिंग प्रकरणावरून महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले होते. अशातच आता या प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना चौकशीसाठी बोलावले आहे. पीडित म्हणून खडसे यांना कुलाबा पोलिसांनी चौकशीसाठी बोलावण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.त्यांचा फोन टॅप केल्याची माहिती देखील समोर आली होती.
काय आहे प्रकरण?
एकनाथ खडसे यांचा फोन टॅपिंग केल्याचा आरोप आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर करण्यात आला आहे. खडसे यांच्याशिवाय शिवसेना नेते संजय राऊत यांचा फोनही टॅप करण्यात आला होता, असा देखील आरोप आहे. त्यामुळे हा संपूर्ण तपास सुरू आहे. हे फोन टॅपिंग महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यापूर्वी घडले होते. दोन्ही नेत्यांचे फोन दोनदा टॅप झाल्याचा आरोप आहे. तेव्हा आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला या एसआयडीच्या प्रमुख होत्या.
महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर फोन टॅपिंग प्रकरणाचा तपास सुरू झाला. मुंबई पोलिसांनी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. या प्रकरणाबाबत रश्मी शुक्ला यांची अनेकदा चौकशी करण्यात आली आहे. मात्र रश्मी शुक्ला चौकशीत प्रश्नांची उत्तरे देत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्ला या चौकशीदरम्यान कोणतेही स्पष्ट उत्तर देत नव्हत्या. रश्मी शुक्ला आपल्या उत्तरात वारंवार सांगत होत्या की, त्यांनी काहीही चुकीचे केलेले नाही. आयपीएस अधिकारी शुक्ला तपासात पोलिसांना सहकार्य करत नसल्यामुळे आता हायकोर्टात पुढील सुनावणीदरम्यान पोलिस त्यांच्या जामीन अर्जाला विरोध करणार आहेत. रश्मी शुक्ला यांना अटकेपासून न्यायालयाकडून संरक्षण मिळाले आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम