१ एप्रिलपासून वाहनांच्या टोलमध्ये १० ते १५ रुपयांची वाढ

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ३१ मार्च २०२२ | तुम्ही राष्ट्रीय महामार्गावरून रोज प्रवास करत असाल तर आता तुम्हाला तुमचे टोल बजेट थोडे वाढवावे लागणार. देशात आधीच महागाईचा भडका उडाला आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या महागाईने सर्वसामान्य होरपळून निघत आहे. अशातच आता भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने१ एप्रिलपासून म्हणजेच आज रात्री १२ वाजता टोल टॅक्स १० ते ६५ रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

राष्ट्रीय महामार्गावर धावणाऱ्या छोट्या वाहनांच्या टोलमध्ये १० ते १५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे, तर व्यावसायिक वाहनांच्या टोलमध्ये ६५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. एक्स्प्रेस वेबद्दल बोलायचे झाले तर सराय काले खान ते काशी टोल प्लाझा पर्यंत, जिथे आधी कार आणि जीपसाठी १४० रुपये मोजावे लागत होते, आता त्यासाठी १५५ रुपये मोजावे लागतील. कानपूर, अयोध्या, रायबरेली आणि सुलतानपूरला जायचे असेल तर आज रात्रीपासून लोकांना वाढीव दराने टोल टॅक्स भरावा लागणार आहे.

रसुलपूर सिक्रोड प्लाझा येथील सराई काळे खान येथूनच आता वाहनचालकांना १०० रुपये मोजावे लागणार आहेत, तर भोजपूरसाठी १३० रुपये मोजावे लागणार आहेत. अनेक प्रकारच्या वाहनांसाठी येथे टोल टॅक्स १०-१५ टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. लखनौ-कानपूर महामार्गावरील नवाबगंज प्लाझा देखील महाग झाला असून, यामध्ये छोट्या वाहनांना ९० रुपये आणि व्यावसायिक वाहनांना २९५ रुपये टोल द्यावा लागणार आहे.लखनौहून अयोध्येकडे जाणाऱ्या वाहनांना आता छोट्या खासगी वाहनांसाठी ११० रुपये मोजावे लागतील, तर ट्रक किंवा बससाठी ३६५ रुपये मोजावे लागतील.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like