विवेकानंद प्रतिष्ठान संचलित प्राथमिक शाळा वाघ नगर येथे पालक – शिक्षक संघ सभा

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | 29 जुलै 2022 | विवेकानंद प्रतिष्ठान संचलित प्राथमिक शाळा वाघ नगर येथे प्राथमिक विभागात दिनांक 28 जुलै 2022 गुरूवार रोजी पालक – शिक्षक संघ सभा घेण्यात आली .पालक सभेचे प्रास्ताविक श्रीराम लोखंडे सरांनी केले. प्रास्ताविकामध्ये कोरोना काळात जगभरात विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. विद्यार्थ्यांचे लेखन वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी मुलांच्या सर्वांगी विकासासाठी विवेकानंद प्रतिष्ठान शैक्षणिक क्षमता चाचणी घेण्यात आली. याकरिता पालकांनी उत्स्फूर्त पणे सहकार्य केले.

 

पालक-शिक्षक संघ सभेला कार्यकारणीची निवड झाली. अध्यक्ष म्हणून श्री हेमराज पाटील सर मुख्याध्यापक उपाध्यक्ष श्री प्रमोद झलवार. सचिव सौ. अंजली जाधव. उपसचिव श्री. पंकज बऱ्हाटे. सहसचिव श्री.श्रीराम लोखंडे तसेच इतर सदस्य उपस्थित होते. या सभेला इयत्ता नववी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन केले जाते तसेच वर्गामध्ये विद्यार्थ्यांचे गटश: नियोजन करून शैक्षणिक गुणवत्ता विकास केला जातो.

या सर्व बाबींना जाहिर अनुमोदन सर्व पालकांनी दिले .तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक चर्चा करण्यात आली पालकांच्या अडचणी व त्या अडचणींचे समर्पक उत्तर माननीय मुख्याध्यापकांनी दिले पालकांचे शंकांचे समाधान झाले. या पालक सभेला यशस्वी करण्यासाठी समन्वयिका सौ वैशाली पाटील दीदी सौ. जयश्री वंडोळे दीदी यांचे मार्गदर्शन लाभले .

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like