गिरणा पुनरूज्जीवन अभियान राज्याला दिशादर्शक

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | 30 जुलै 2022 | गिरणा खोऱ्याच्या समृद्ध विकासासाठी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी ३८० किलोमीटर गिरणा परिक्रमा केल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले असून येथील शेतकऱ्यांनी या अभियानात महाश्रमदान कार्यक्रमात भरीव सहभाग घेतला. विविध गावानी नदी विकासाची प्रेरणा घेतली आहे. ही आनंदाची बाब असून गिरणा पुनरूज्जीवन अभियान शेतकऱ्यांची एक भावनिक चळवळ झाली असून आज या शेतकऱ्यांना बांबू रोपांचे वाटप करण्यात आले असून येत्या काळात हे अप्रतिम गिरणा पुनरूज्जीवन अभियान राज्याला दिशादर्शक ठरेल. असे आग्रही प्रतिपादन राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी व्यक्त केले आहे.

आज जिल्ह्यात विविध प्रकल्पांना भेटी व पाहणी दौऱ्यानिमित्त एकनाथ डवलेसाहेब जळगाव जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी खासदार उन्मेशदादा पाटील संकल्पित गिरणा पुनरूज्जीवन अभियानात महाश्रमदान झालेल्या पिलखेडा येथे आज एकनाथ डवले साहेबांनी शेतकऱ्यांची भेटून संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी गिरणा पुनरूज्जीवन अभियानातून खासदार उन्मेश दादा पाटील यांनी दिलेली चतु:सूत्री आम्ही अवलंबली असून आम्हाला नदी विकासाचा शाश्वत मार्ग दिल्याचे सांगितले. यावेळी राज्याचे प्रधान सचिव (कृषी) एकनाथ डवलेसाहेब यांच्या हस्ते शेतकऱ्यांना बांबू रोपांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर साहेब यांनी अभियानाबद्दल माहीती दिली.

यावेळी प्रकल्प उपसंचालक (आत्मा) कुरबान तडवी, कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ वैभव सूर्यवंशी, तालुका कृषि अधिकारी शिवाजी राऊत, मंडळ कृषी अधिकारी श्रीकांत झांबरे, एम.जी.जंगले कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गिरणा पुनरूज्जीवन अभियान अप्रतिम अभियान
सुरुवातीला प्रकल्प समन्वयक विजय कोळी यांनी एकनाथ डवले साहेबांचे स्वागत करीत खासदार उन्मेश दादा पाटील यांचा अभियान राबविण्यामागील उद्देश विषद केला. भाजपचे तालुकाध्यक्ष गोपाळ दादा भंगाळे, पंचायत समिती सदस्य ऍड. हर्षलदादा चौधरी, पिलखेडा सरपंच झिंगा कोळी, अमोल चौधरी, पंकज चौधरी, निलेश साळुंखे , गिरणा अभियान जळगाव तालुका समन्वयक लतेश चौधरी, जितेंद्र पाटील, सुभाष देठे, नवल राठोड, अक्षय भोई, गौरव कोल्हे, व सर्व गावकरी शेतकरी बंधू उपस्थित होते.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like