जन्मशताब्दी वर्षानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १ मार्च २०२२ | जळगाव शहरातील सरदार वल्लभाई पटेल येथे डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्यावतीने आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

सरदार वल्लभाई पटेल लेवा भवन येथे डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्यावतीने डॉ. आप्पासाहेब व सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनातून महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

योग्य डाक्टर आणि सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आले. या शिबिरात २५० जणांनी रक्तदान केले. यावेळी आ. राजुमामा भोळे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, महापौर जयश्री महाजन, शिवसेना जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे आदींनी रक्तदान शिबिराला भेट देऊन प्रतिष्ठान यांच्या कार्याचे कौतुक केले.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like