रक्षा खडसे यांच्या हस्ते संत मुक्ताईचे व महादेवाची पूजा

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १ मार्च २०२२ | जळगाव येथे महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र तापीतीर मेहून येथील पुरातन महादेव मंदिर व मुक्ताई मंदिरात खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते संत मुक्ताईचे व महादेवाची पूजा व आरती करण्यात आली.

महाशिवरात्री च्या पर्वावर दरवर्षी उत्सव भरत असतो. या यात्रोत्सवाला शेकडो वर्षाचा इतिहास आहे. भागवत एकादशी पासुन महाशिवरात्री च्या पाडव्या पर्यत असा पाच दिवस यात्रोत्सव चालतो. वारकऱ्यांसह लाखो श्रध्दाळु भाविकांची उपस्थिती महाशिवरात्री निमित्त येथे असते.

यावेळी खासदार रक्षाताई खडसे यांनी श्री क्षेत्र मेहून (तापीतीर) संस्थानाचे अध्यक्ष रामराव महाराज, सुधाकर महाराज, पुजारी भानुदास महाराज, सचिव दत्तू पाटील, विकास पाटील व समस्त विश्वस्त मंडळ यांच्याशी संस्थानात होणाऱ्या विविध विकास कामे, धार्मिक कार्यक्रम व इतर बाबींविषयी सविस्तर चर्चा केली.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like