सामान्य नागरिकांना मिळाला दिलासा, पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १० मार्च २०२२ | आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका उडाला असला तरी भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहे. भारताची इंधनाची गरज भागवण्यासाठी जवळपास ८४ टक्के खनिज तेल आपण आयात करतो.रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून युद्ध सुरू असून, त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींवरही झाला आहे.

आज कच्च्या तेलात विक्रमी वाढ होऊनही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर होताच इंधन १५ ते २० रुपयांनी वाढेल अशी चर्चा सुरु आहे. उत्तर प्रदेश, पंजाबसह देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका आता संपल्या आहेत. आज जळगावमध्ये एका लिटर पेट्रोलचा दर १११.२९ रुपये इतका आहे. तर डिझेलचा ९४.२० रुपये प्रति लिटर इतका आहे. सर्वात सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दरदेखील जाहीर करण्यात आले आहेत.

पेट्रोल-डिझेलच्या किमती तेजीच्या सट्टा दरम्यान, १० मार्च रोजी भारतीय तेल कंपन्यांनी आजही इंधनाचे दर बदललेले नाहीत. गेल्या काही दिवसांपासून रोखून धरलेली पेट्रोल-डिझेलची दरवाढीला सुरुवात होणार आहे. सलग 125 दिवसांनंतरही देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोलियम कंपन्यांनी आजही इंधनाच्या किमती स्थिर ठेवल्या नागरिकांना आज दिलासा मिळाला आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like