सीए परीक्षेमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १० मार्च २०२२ | सीए, जळगाव शाखेचा पदहस्तांतर सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात .सीए परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. मावळते अध्यक्ष प्रशांत अग्रवाल यांनी अध्यक्षपदाची सूत्रे नवनिर्वाचित अध्यक्ष विकी बिर्ला यांच्याकड सुपूर्द केला.

या सोहळ्याला जिल्हाधिकारी अभिजित राऊत, आयसीएआयच्या केंद्रीय परिषदेचे सदस्य उमेश शर्मा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यकारिणीत अध्यक्षपदी विकी बिर्ला, उपाध्यक्ष व विद्यार्थी शाखा अध्यक्षा ममता राजानी केजरीवाल, सचिव अभिषेक कोठारी, कोषाध्यक्ष हितेश आगीवाल, तर रोशन रुणवाल, सोहन नेहेते यांची सभासद म्हणून निवड करण्यात आली.

या वेळी नुकत्याच झालेल्या सीए परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या एकूण २३ विद्यार्थ्यांचा सीसीएम उमेश शर्मा यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
सीए परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थीना तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. सत्कारानंतर सभासदांसाठी अलीकडे जी. एस. टी. मध्ये झालेल्या सुधारणा आणि जीएसटीअंतर्गत नोटिसा या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. योग्य अभ्यासाचे दिशा दाखवणे, माहिती दिली,तसेच अनेक विषयावर उमेश शर्मा यांनी मार्गदर्शन केले. दिव्या झवर यांनी सूत्रसंचालन केले असून अभिषेक कोठारी यांनी आभार मानले.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like