कर्तुत्ववान महिलांचा सत्कार आणि प्रोत्साहन, माजी आमदार स्मिता वाघ

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १० मार्च २०२२ | जळगाव शहरातील अमळनेर येथील प्रताप तत्वज्ञान केंद्रात जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महिलांच्या या कर्तुत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी हा कार्यक्रम झाला. आधुनिक व स्पर्धेच्या युगात महिलांनी सर्वच क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने यश मिळवले, कुटुंबात देखील महिलांचे मोठे योगदान असते ही बाब अभिमानास्पद आहे.

कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून ऍड.पद्मिनी भावसार या उपस्थित होत्या. कार्यक्रमास उपस्थित प्रा.अशोक जैन, ललिता जैन,डॉ.रमेश वानखेडे, निरंजना वानखेडे यांचा सत्कार करण्यात आला. प्रताप तत्वज्ञान केंद्रात कार्यरत सदस्य व कर्मचाऱ्यांच्या परिवारातील महिलांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.
अमळनेर येथील प्रताप तत्वज्ञान केंद्रात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात माजी आमदार स्मिता वाघ यांनी सांगितले.

आपले कुटुंब, समाज यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे आपण हे यश मिळवू शकलो. सर्व जाणीव ठेवून आपल्या कुटुंबातील संस्कार टिकवण्यासाठी महिलांना मोठे योगदान द्यावे लागेल असे प्रतिपादन माजी आमदार स्मिता वाघ यांनी केले. यावेळी ऍड.पद्मिनी भावसार व प्रा.डॉ.राधिका पाठक यांनी समयोचित मनोगत व्यक्त केले. सल्लागार समितीचे सदस्य प्रा.धर्मसिंह पाटील व प्रा.प्रतिक्षा कुलकर्णी यांनी स्वरचित कविता सादर केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्राचे मानद संचालक प्राचार्य डॉ.दिलीप भावसार यांनी केले.

यावेळी प्रताप तत्वज्ञान केंद्रात कार्यरत असलेल्या प्रा.डॉ.राधिका पाठक, प्रा.प्रतिक्षा कुलकर्णी, सुवर्णा रायगडे, रईसा शेख यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. श यात शकुंतला पाटील, प्रा.शालिनी व्यास, वैभवी नाईक, प्रिया भोई, सपना माळी यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्रा.नरेंद्र भोई, रविंद्र व्यास उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सिनेट सदस्य दिनेश नाईक यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युनूस शेख, गोपाल माळी, बापू पाटील, उमेश अहिरराव आदींनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like