काँग्रेसतर्फे काँग्रेसचे नवनिर्वाचितज्ञ अध्यक्षाचा सत्कार
खान्देश लाईव्ह | १० मार्च २०२२ | जळगाव येथील यावल तालुका व शहर काँग्रेसतर्फे युवक काँग्रेसचे नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष फैजान अब्दुल गफ्फार शाह यांचा सत्काराचा कार्यक्रम पार पडला आहे. तर मारुड येथे मुदासन झर यांची उपाध्यक्षपदी निवड झाली.
यावल तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा जि.प.चे गट नेते प्रभाकर सोनवणे यांनी फैजान शाह याना बहु मताने विजय झाला. मारुड येथे मुदासन झर यांना उपाध्यक्ष आणि फैजपूर येथे जावेद जनाब यांना महासचिव पदे मिळाली त्यांचंही अभिनंदन सोनवणे यांनी केले. बहु मताने विजयी झाल्याने अभिनंदन व्यक्त करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पक्षांनी प्रतेकांना कार्यकारणी मध्य पदे दिलेले आहेत.
नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्षांच्या सत्कारा करता यावेळी वडोदे चे सरपंच संदीप सोनवणे, शेतकी संघाचे संचालक अमोल भिरुड, नगरसेवक मनोहर सोनवणे, तालुका उपाध्यक्ष हाजी गफ्फार शाह, शहर अध्यक्ष कादिर खान, शहर उपाध्यक्ष अनिल जंजाले, नईम शेख, विक्की गाजरे, अश्फाक शाह, शेख सकलेन आदी उपस्थित होते.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम