चार राज्यात भाजपची आघाडी तर, पंजाबमध्ये आपने मारलेली मुसंडी

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १० मार्च २०२२ | राज्यातील ५ विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत असून जवळपास चित्र स्पष्ट झाले आहे. आम आदमी पक्षाला पूर्ण बहुमत आकड्यासह तब्बल ८९ जागांवर आघाडीवर आहे. यामधील सर्वाधिक लक्ष हे उत्तर प्रदेशच्या निकालाकडे असणार आहे. उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा भाजपाचं सरकार येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

देशात सर्वाधिक विधानसभा उमेदवार असलेले राज्य म्हणून ओळखले जाणाऱ्या उत्तरप्रदेशच्या निवडणुकीसाठी भाजप आणि सपा जोरदार प्रचाराला लागले होते. तर पंजाबमध्ये आपने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. उत्तराखंड, मणिपूर, गोव्यात देखील भाजपने मोठे यश मिळवले आहे. उत्तरप्रदेशात भाजप पुन्हा जादुई आकडा पार करण्यात यशस्वी ठरली आहे. गेल्या काही महिन्यांपासून पंजाबमधील राजकारणात मोठी घुसळण सुरू असल्याचं पाहायला मिळालं आहे.

उत्तरप्रदेशात एकूण ४०३ जागांसाठी लढत होती. त्यात भाजप २६७, सपा १२४, बसपा ५, काँग्रेस ४, इतर ३ ने आघाडीवर आहे. यूपीत सत्तांतर होणार अशी चर्चा सुरु असताना पुन्हा भाजपने बाजी मारली आहे. योगी सरकारचा करिश्मा चालला असला तरी अखिलेश यादव यांच्या सपाने देखील चांगली बाजी मारली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पुन्हा एकदा सरकार बनवताना दिसत आहेत. योगी आदित्यनाथ सलग दुसऱ्यांदा आपल्या पक्षाला सत्ता देणार असून उत्तर प्रदेशच्या इतिहासातील असे पहिले मुख्यमंत्री बनतील.

उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोव्यात भाजपचा करिष्मा चालला आहे तर पंजाबमध्ये आपचा झाडू जोरदार चालला असून सर्वांचाच सुपडा साफ झाला आहे.आज हाती आलेल्या निकालात उत्तराखंडमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्याचे चित्र आहे. अद्याप स्पष्ट निकाल हाती आलेले नसले तरीही दुपार्यंतच्या ट्रेंडनुसार, भाजप- 48, काँग्रेस- 20, बसपा-01, अपक्ष- 02, उत्तराखंड जनता पार्टी- 01
अशा जागांवर विजयी होण्याची चिन्ह आहेत.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like