आजचे राशिभविष्य,पहा कसा आहे आजचा दिवस
खान्देश लाईव्ह | १० मार्च २०२२ | मेष : संथ व साधा दिवस. मन निराश वाटेल.दिवस घरात शांतपणे घालवा. ईश्वरी उपासना बळ देईल.
वृषभ: आज चंद्र राहू राशीतून भ्रमण करीत आहेत. मन थोडे निराश होण्याचे संकेत आहेत. काळजी घ्या.
मिथुन : आज शरीर थकलेले वाटेल. जास्त दगदग टाळा.
नको असलेली कामं गळ्यात येतील. मानसिक ताण येईल. आर्थिक बाजू सांभाळा. दिवस मध्यम.
कर्क : आज भक्तिमय वातावरणात दिवस मंगलमय होईल. वाचन मनन कराल. संततीसुख मिळेल. धार्मिक कार्यक्रम किंवा पूजेत सहभागी व्हाल.
सिंह : आज तुमच्यापुढे कामाचा डोंगर असेल. जास्त ताण न घेता आलेली जबाबदारी पार पाडाल. पितृ सुख मिळेल.
कन्या : तुमच्यापुढे आज प्रवास, भेटीगाठी कार्यक्रमात सहभाग असे भरपूर पर्याय असतील. भाग्य साथ देईल. तुम्ही योग्य निर्णय घ्याल.
तूळ : आज दिवस अष्टम चंद्र आणि राहुमुळे त्रासदायक आहे. घरात ताणलेले वातावरण राहिल.
वृश्चिक : आज राशीच्या सप्तम स्थानात चंद्र तणावमुक्त करेल. धार्मिक कार्यात मन गुंतून राहिल. वैवाहिक सुख मिळेल.
धनु : आज षष्ठ चंद्र आर्थिक आणि शारीरिक ताण देईल. जपून रहा. राशीच्या द्वितीयात मंगळ शनि आहे.
मकर : आज दिवस लाभदायक असून तुमच्यासाठी अनेक संधी घेऊन येईल. राशीतील शनि मंगळ प्रवास योग आणेल.
कुंभ : आज दिवस कार्यक्षेत्रात काही विशेष घडामोडींचा आहे. यश मिळेल. आर्थिक लाभ होतील. दूरचे प्रवास योग येतील.
मीन : आज भाग्यदायक आणि आनंदी दिवस आहे. सगळीकडून सुसंधी, लाभ, प्रवास भेटीगाठी यात दिवस आनंदात निघून जाईल.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम