एटीएम फोडण्याचा प्रयत्न, चोरट्यांच्या हाती आलेले अपयश
खान्देश लाईव्ह | ९ मार्च २०२२ | शहरातील पिंप्राळा रोडवरील मध्यरात्री एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. परंतु कोणत्याही प्रकारची लुक झाली नाही. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील बजरंग बोगद्याजवळ आणि पिंप्राळा रोडवरील प्रेम नगर पेट्रोलपंपाजवळ असलेल्या बँक ऑफ इंडियाचे एटीएम मध्यरात्री अडीचे ते तीन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. अज्ञात चोरट्यांनी सुरूवातीला एटीएमच्या बाहेरचा आतल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रेने काळा रंग मारला. त्यानंतर दगडाने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. एटीएम मशीन न फुटल्याने चोरट्यांना रिकामे हाती परतावे लागले. मोठी लुट होता होति वाचली आहे.
हा सगळाप्रकार सकाळी ७ वाजेच्या सुमारास प्रेमनगरातील नागरीकांच्या लक्षात आला. त्यावेळी काही सुज्ञ नागरीकांना जिल्हापेठ पोलीस ठाण्याला कळविण्यात आले. दरम्यान जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्यासह पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून माहिती घेतली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अद्याप गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली नव्ह
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम