उपविभागीय दंडाधिकारयांनी वर्षभरासाठी गुन्हेगारांना केले हद्दपार

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ९ मार्च २०२२ | दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली आहे. याला कुठे तरी आळा घालण्यासाठी प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे दिसून आले. आज अनेक गुन्हेगार खुलेआम फिरताना दिसतात. कोणत्याही कारवाईला होत नाही. परंतु जळगावात भुसावळ शहरातील व तालुक्यातील सराईत गुन्हेगार असलेल्या दोन जणांना उपविभागीय दंडाधिकारी यांनी एक वर्षासाठी हद्दपार केले आहे.

शहरातील गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी गुन्हेगारी टोळ्या आणि गुंडांना हद्दपार करण्याचा तडाखा उठवला आहे. यातच आगामी पालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता पोलिस प्रशासनाने उपद्रवींच्या हद्दपारीचे प्रस्ताव प्रांतांकडे सादर केले आहेत.

या निवडणुकांच्या अनुषंगाने प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांनी भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील मंगल देविदास कोळी, भुसावळ शहरातील दीनदयाल नगरीत शेख नईम सलीम शेख याना एक वर्षासाठी हद्दपार केले आहे.या दोन्ही सराईत गुन्हेगारांवर भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे.

यासंदर्भात डी. वाय. एस. पी सोमनाथ वाकचौरे यांनी भुसावळ उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे हद्दपारीसाठी प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावावर सुनावणी होऊन दोन्ही सराईतांना एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारी विश्‍वात खळबळ उडाली आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like