१८ वर्षाच्या आतील बालकांना दत्तक घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी सुरु

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १५ नोव्हेंबर २०२२ | बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण दुरुस्ती नियम 2022 नुसार मा. न्यायालयासमोर प्रलंबित आलेल्या दत्तक प्रकरणांशी संबंधित सर्व प्रकरणे नियम सुरु झाल्याच्या तारखेपासून मा. जिल्हादंडाधिकारी यांचे कडे हस्तांतरीत केली जातील अशी दुरुस्ती बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण दुरुस्ती नियम 2016 मध्ये करण्यात आली असून बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण दुरुस्ती नियम 2022 दिनांक 1 सप्टेंबर, 2022 रोजी अधिसुचित केले आहे. केंद्रीय दत्तक विधान प्रक्रियेबाबत महिला व बाल विकास मंत्रालय, सुधारित अधिसुचना 2022 नुसार 18 वर्षा आतील बालकांना बाळ दत्तक घेण्यासाठी दत्तक इच्छुक पालकांनी ( दत्तक इच्छुक पालक, रक्तनाते संबधातील पालक व सावत्र पालक) cara.nic.in या संकेत स्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.

राज्यात दत्तक विधानाच्या प्रलंबित प्रकरणांची संख्या प्रचंड वाढली आहे व मा. न्यायालयाकडील इतर केसेसचेही प्रमाण जास्त असल्याने दत्तक प्रकरणांबाबत मा. न्यायालयातुन आदेश येईपर्यंत सहा महिन्यापेक्षा अधिक काळ लागत असल्याने अनेकदा कायदेशीर प्रक्रिया टाळून गुपचुप मुल दत्तक घेण्याचे प्रकार घडतात व ते बेकायदेशीर आहे व त्यामुळे बालकांना पुढील भविष्यात अनेक अडचणींना समोर जावे लागते व आयुक्तालयाच्या निर्देशानुसार न्यायालयाकडील सर्व प्रकरणे ही मा. जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे हस्तांतरीत केली जाणार असुन संबंधित पालकांनी अर्ज केल्यानंतर जिल्हास्तरावर जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत पडताळणी व कागदपत्रांची तपासणी केली जाईल, केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण (CARA) राज्य दत्तक संसाधन (SARA) यांचे पुर्वमान्यतापत्र प्राप्त झाल्यावर जिल्हाधिकारी अमन मित्तल यांची मान्यता घेवून जिल्हाधिकारी यांच्याकडे सुनावणी होवून दत्तक कागदपत्रे योग्य असतील व बाळ दत्तक घेण्याचा उद्देश योग्य असल्यास जिल्हाधिकारी यांचे आदेश निर्गमित करुन सदर दत्तक प्रक्रिया 60 दिवसात पुर्ण केली जाणार आहे. व अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय / जिल्हा बाल संरक्षण कक्ष जळगाव येथे संपर्क साधण्यात यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी जळगाव यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like