गोदावरी लक्ष्मी को-ऑप बँकेच्या अध्यक्षपदी डॉ.उल्हास पाटील तर उपाध्यक्षपदी सोनू भंगाळे

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १५ नोव्हेंबर २०२२ | गोदावरी लक्ष्मी को ऑपरेटिव्ह बँकेची सन २०२२-२७ या वर्षासाठी असलेली अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक आज मंगळवार, दि.१५ नोव्हेंबर रोजी बिनवरोध झाली. यात अध्यक्षपदी डॉ.उल्हास वासुदेव पाटील तर उपाध्यक्षपदी सोनू गोमा भंगाळे यांची एकमताने निवड झाली.
याप्रसंगी संचालक मंडळातील सुभाष वासुदेव पाटील, लिलाधर विश्वनाथ चौधरी, शालिग्राम देवाजी चौधरी, चंद्रकुमार निंबा चौधरी, डॉ.संपत बारसु वानखेडे, सुरेश प्रेमचंद्र झोपे, राजेंद्र टिकाराम कुरकरे, सौ.आशा रघुनाथ तळेले, सौ.यमुनाबाई यादव महाजन, हरिष नामदेव फालक, सौ.संगिता नितीन चौधरी, राजेंद्र शिवराम महाजन यांची उपस्थीती होती. सर्वानुमते ही निवड बिनविरोध झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कि.द.पाटील, व्यवस्थापकीय संचालक अशोक महाजन, राजेश महाजन व प्रशांत धमके यांनी काम पाहिले.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like