मेहुणबारे येथे घरफोडी ; २ लाखांचा ऐवज लंपास
खान्देश लाईव्ह | १६ नोव्हेंबर २०२२ | बंद घर फोडून चोरट्यांनी घरातून १ लाख ५० हजार रूपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा एकुण २ लाख ६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लांबविण्याची घटना चाळीसगाव तालुक्यातील नवेगाव मेहुणबारे येथेउघडकीस आली असून याबाबत मेहुणबारे पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरेश अभिमन कोकनदे रा. नवेगाव मेहुणबारे हे त्यांची आत्या विमलबाई पुंडलिक निकम यादेखील राहतात. आत्या विमलबाई ह्या घराला कुलूप लावून बाहेरगावी गेल्या होत्या. १४ नोव्हेंबर रात्री ९ ते १५ नोव्हेंबर सकाळी ११ वाजता दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातील गोदरेज कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले १ लाख ५० हजार रुपयांची रोकड आणि ५६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असा एकुण २ लाख ६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून दिल्याचे समोर आले आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर सुरेश कोकनदे यांनी मेहुणबारे पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याने विरोधात मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड तपास करीत आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम