एरंडोलमधून एकाची दुचाकी लांबविली
खान्देश लाईव्ह | ६ नोव्हेंबर २०२२ | तरूणाची १५ हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने शहरातील देशपांडे गल्लीतील चोरून नेली. याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जय अरुण पाटील (वय-३६, रा. देशपांडे गल्ली, एरंडोल) हा तरुण कामावर जाण्यासाठी त्याच्याकडे (एमएच १९ के १४१) क्रमांकाची दुचाकी आहे. २९ ऑक्टोबर रात्री ११ ते ३० ऑक्टोबर सकाळी ५ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांची १५ हजार रुपये किंमतीची घरासमोर लावलेली दुचाकी चोरून नेली. त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला. परंतु दुचाकी कुठेही मिळून आले नाही. . त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पोलीस हेकॉ. सुनील लोहार पुढील तपास करीत आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम