चक्कर येवुन पडल्याने तरूणाचा मृत्यू

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ६ नोव्हेंबर २०२२ | तरूणाचा अचानक चक्कर येवुन पडल्याने दुदैवी मृत्यू झाल्याची घटना यावल तालुक्यातील मनवेल ययेथे घडली आहे.

यावल तालुक्यातील मनवेल येथील रहिवासी शेतमजुरी करणारा तरुण दिपक काळे (वय-३७) याला ४ नॉव्हेबर रोजी आपल्या घरात अचानक चक्कर येवुन तो जमीनीवर कोसळला त्यास तात्काळ उपचारासाठी प्रथम यावलच्या ग्रामीण रूग्णालयात व नंतर भुसावळ येथे उपचारासाठी दाखल केले. काळे यांच्या छाती दुखु लागल्याने श्वास घेण्यास त्रास होवु लागल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. वैद्यकीय अधिकारी डॉ शेख यांच्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस करीत आहे .

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like