पाचोरा येथे कापड दुकानाला आग ; ६० लाखांचा मुद्देमाल खाक
खान्देश लाईव्ह | ६ नोव्हेंबर २०२२ | मुद्रा एन. एक्स या रेडिमेड कापड दुकानास आज ६ नोव्हेंबर रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याची घाट शहरातील बस स्टॅण्ड रोडवर घडली . फर्निचर सह सुमारे ६० लाख रुपयांचे कापड जळुन खाक झाले .
नागरिकांनी मिळेल तेथुन पाणी आणत आग विझविण्याचा प्रयत्न केला.
शहरातील बस स्टॅण्ड रोडवर गणेश प्लाझा शाॅपिंग सेंटर आहे. या शाॅपिंग सेंटर मधील दुकान क्रं. ५ हे मुद्रा एन. एक्स. या नावाने नावाजलेले कापड दुकान असुन दुकान चालक राहुल मोरे रा. शिवाजी नगर, पाचोरा यांनी दिवाळी निमित्त दुकानात नव नविन ब्रॅण्ड ची विविध रेडिमेड कापड भरुन ठेवली होती. आग लागल्याचे तेथुन जाणाऱ्या एका रुग्णवाहिका चालकास निदर्शनास येताच रुग्णवाहीका चालकाने तात्काळ राहुल मोरे यांना भ्रमणध्वनी द्वारे कल्पना दिली असता राहुल मोरे यांनी घटनास्थळी धाव घेत पाचोरा नगरपालिकेच्या अग्निशमन दलास आग लागल्याचे सांगितले. मात्र अग्निशमन दलास घटनास्थळी पोहचण्यास विलंब झाल्याने आगीने रौद्ररूप धारण करत संपूर्ण दुकानास वेढा घातला. आग नेमकी कशामुळे लागली असावी याचे कारण अद्याप समजू शकले नसुन शाॅर्ट सर्किटमुळेच आग लागली असावी असा अंदाजव्यक्त होत आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम